माजी खासदार राणेंच्या वाढदिवस उपक्रमांनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माजी खासदार राणेंच्या
वाढदिवस उपक्रमांनी
माजी खासदार राणेंच्या वाढदिवस उपक्रमांनी

माजी खासदार राणेंच्या वाढदिवस उपक्रमांनी

sakal_logo
By

89667
सावंतवाडी ः गरजू महिलांना धान्य वाटप करताना संजू परब. शेजारी इतर.

माजी खासदार राणेंच्या
वाढदिवस उपक्रमांनी
सावंतवाडी, ता. १७ ः भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांचा वाढदिवस माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील भाजी विक्रेत्या महिलांना धान्य वाटप करण्यात आले. ऊन-पाऊस झेलत पालिकेसमोर उभे असणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी पत्र्याची शेड रफिक शेख यांच्या माध्यमातून उभारली.
येथील भाजपच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख श्री. परब हे दरवर्षी माजी खासदार राणेंचा वाढदिवस साजरा करतात. विविध सामाजिक उपक्रम राबवून हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी शहरात भाजी विक्री करणाऱ्या गरीब गरजू महिलांना धान्य वितरण करण्यात आले. दरम्यान, यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी नगरसेवक मनोज नाईक, शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, गुरू मठकर, सत्यवान बांदेकर, केतन आजगावकर, समीर पालव आदी उपस्थित होते.