तिलारी कालव्यामध्ये पाणी पोहोचले नसल्याने संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिलारी कालव्यामध्ये पाणी 
पोहोचले नसल्याने संताप
तिलारी कालव्यामध्ये पाणी पोहोचले नसल्याने संताप

तिलारी कालव्यामध्ये पाणी पोहोचले नसल्याने संताप

sakal_logo
By

89677
सावंतवाडी ः पाटबंधारे विभागाला निवेदन देताना इन्सुलीवासीय.

तिलारी कालव्यात पाणी
पोहोचले नसल्याने संताप

इन्सुलीवासीयांचे ‘पाटबंधारे’ला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः मार्च अखेर होत आली तरी अद्याप इन्सुली येथील तिलारी कालव्यात पाणी न पोहोचल्याने इन्सुलीवासीयांमधून संताप व्यक्त होत आहे. गतवर्षी कालव्यात पाणी आल्याने ग्रामस्थांची पाण्याची गैरसोय टळली होती; मात्र यंदा अद्याप पाणी न पोहोचल्याने बागायती पाण्याअभावी सुकून जात आहेत.
१० एप्रिलपर्यंत तिलारीचे पाणी इन्सुलीत न पोहोचल्यास शेतकऱ्यांसह घागर घेऊन इन्सुली कालव्यात पाणी येईपर्यंत मूक आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्या सोनाली मेस्त्री यांनी दिला. याबाबतचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मेस्त्री यांच्यासह सुषमा बोर्डेकर, संतोष मेस्त्री, संदीप बोर्डेकर, सौ. नाईक उपस्थित होते. हे निवेदन पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अनिल मोहिते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.