संपातील कर्मचार्‍यांची कामे दिल्यास आंदोलन करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपातील कर्मचार्‍यांची कामे दिल्यास आंदोलन करू
संपातील कर्मचार्‍यांची कामे दिल्यास आंदोलन करू

संपातील कर्मचार्‍यांची कामे दिल्यास आंदोलन करू

sakal_logo
By

संपातील कर्मचाऱ्यांची कामे
दिल्यास आंदोलन करू
आशा व गटप्रवर्तक संघटना ; सीओंना इमेलद्वारे निवेदन
रत्नागिरी, ता. १६ः शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांना काम करण्याची सक्ती करण्याची शक्यता आहे. तसे आदेश काढल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा निवेदनाद्वारे महाराष्ट्र आशा व गट प्रवर्तक कामगार संघटनेतर्फे दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाला आशा व गट प्रवर्तक कामगार संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आशा व गटप्रवर्तक महिलांवर अगोदरच शासनाने काम वाढवले आहे. त्याचा ताण आशांवर आहे. त्यामुळे सध्या असलेलेच काम करण्यासाठी महिलांना खूपच कष्ट करावे लागते. त्या कामाच्या प्रमाणात शासनाकडून दरमहा २६ हजार रुपये देण्याचीही तयारी नाही. राज्य कर्मचारी संपाला संघटनेचा पाठिंबा असल्यामुळे संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांची आम्ही काम करणे म्हणजे संपाच्या विरोधात जाण्यासारखेच आहे. राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या व जुनी पेन्शन योजना मंजूर करावी. आशा व गटप्रवर्तक महिलांना शासन कर्मचारी कामगार म्हणायला तयार नाही, कामगारांचे हक्क द्यायला तयार नाही; परंतु जे कायम कामगार आहेत, त्यांची कामे करायला सांगत असेद तर याचा अर्थ जे राज्य कर्मचारी सध्या काम करतात ते काम करण्याची पात्रता आशा व गटप्रवर्तकांमध्ये आहे. परंतु जाणीवपूर्वक शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा दिला जात नाही. त्यामुळे व गटप्रवर्तकांना कसलेही काम करण्यास सांगू नये. असे काम करण्याबाबत काढलेले आदेश बेकायदेशीर ठरतील. कामे करण्याची सक्ती कुणी अधिकार्‍यांनी केल्यास त्यांच्याविरोधी शासनाने कारवाई करावी असे न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या जनरल सेक्रेटरी सुमन शंकर पुजारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन ईमेलद्वारे सार्वजनिक आरोग्य सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यास आले आहे.