
अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्निकल फेस्टिव्हल उत्साहात
अभियांत्रिकी महाविद्यालयात
टेक्निकल फेस्टिव्हल उत्साहात
कणकवली,ता. १७ ः येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील टेक्निकल फेस्टिव्हला जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालतील ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नुकत्याच झालेल्या व्हर्च्युओसिक टेक्निकल फेस्टिव्हलचे उद्घाटन मालवण येथील तंत्रनिकेतनचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी अंजली मुतालिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिश गांगल, प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. सौरभ कुलकर्णी, सह संयोजिका प्रा. सोनाली कदम, जनरल सेक्रेटरी चैतन्य आरेकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी योगीता लोके, विद्यार्थी संयोजक आदित्य चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुरेश पाटील म्हणाले की, ‘‘अभियंत्याने प्रकल्पामधून समाजोद्धारासाठी प्रयत्नशील राहावे. ज्याच्यामुळे देशाची उन्नती होईल.’’ या कार्यक्रमामध्ये आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सायन्स फेअर’ आयोजित केले होते. ज्यामध्ये जिल्ह्यातील शाळा व हायस्कूल मधील आपले छोटे वैज्ञानिक ज्यांनी विज्ञानाचे कल्पक असे प्रोजेक्ट केले त्यांना या कार्यक्रमात प्रोजेक्ट सादर करता आले. नामवंत कंपन्या व रिसर्च सेंटर मधील रिसर्चर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळेल.