संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

कापरेत अर्जुन सादडाची लागवड

चिपळूण ः जागतिक वनदिनानिमित्त चिपळुणातील आम्ही मिळून सारे या ग्रुपने कापरे येथे अर्जुन सादडा या लोप पावत चाललेल्या वृक्षाचे जतन करण्यासाठी ५०० बियांचे शास्त्रशुद्ध रोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाचा आरंभ १९ मार्चला होणार आहे. हा ग्रुप गेली ८ वर्ष वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवड करत आहे. जागतिक वनदिनानिमित्त कापरे येथे अर्जुन सादडा या वृक्षाच्या ५०० बियांचे रोपण करण्यात येणार आहे. हा बिया रोपणाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होईल. अर्जुन सादडा ही लोप पावत चाललेली औषधी वनस्पती असून हिची लागवड करण्याचे या ग्रुपने ठरवले आहे. यावेळी कापरे येथील सरपंच कदम, समन्वयक प्रमोद ठसाळे, डॉ. रत्नाकर थत्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
-
८९६४०
लांजा ः कृषी महावद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेरळ येथे अझोलाबाबत जनजागृती केली.
---
अझोला वापराबाबत मार्गदर्शन

लांजा ः विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील ''कृषक सोबती'' गटातील विनय भेरे, आदित्य देशमुख, प्रथमेश जाधव, अनिरुद्ध रेडिज, तलहा अराई, अनिकेत नालगोंडा, शुभम पारकर, प्रवीर देसाई, ओमकेश पेडणेकर या विद्यार्थ्यांनी अझोला निर्मिती तसेच अझोला वापराबाबत मार्गदर्शन केले. अझोला ही मुळात पाण्यावर वाढणारी, हरितद्रव्याने युक्त वनस्पती आहे. ज्यामध्ये नत्राचे प्रमाण जास्त असते त्याचा उपयोग शेतामध्ये केल्यावर जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण योग्य राहते, त्यासोबतच अझोला हे दुधारू जनावरांसाठी योग्य खाद्य आहे. याच्या आहारातील समावेशाने दुधामध्ये वाढ होते. ही माहिती शेतकऱ्यांना नव्याने समजली. या विद्यार्थ्यांनी अझोलाची निर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले. त्याची काळजी कशी घ्यावी, त्याचा योग्य वापर कसा करता येईल हे शेतकऱ्यांना सोप्या भाषेत सांगितले. शेतकऱ्यांनीही अझोला निर्मितीला सुरवात करण्याची तयारी दाखवली आहे.
-
वेरळला कीटकनाशक फवारणीचे मार्गदर्शन

लांजा ः विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी विनय भेरे, आदित्य देशमुख, प्रथमेश जाधव, अनिरुद्ध रेडिज, तलहा अराई, अनिकेत नालगोंडा, शुभम पारकर, प्रवीर देसाई, ओमकेश पेडणेकर यांनी वेरळ येथील शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी व हाताळणीबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी ''कृषक सोबती'' या गटातील विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांना फवारणी योग्यरित्या कशी करायची व फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी तसेच प्रात्यक्षिक करून दाखवले. फवारणीचे महत्व व फायदे सांगितले. हा कार्यक्रम सरपंच सुवर्णा जाधव यांच्या उपस्थितीत वेरळ शाळेत झाला. या वेळी २० ते २२ शेतकरी उपस्थित होते.
--