
तीन सुवर्ण, सहा रौप्य व तीन कांस्य पदकांची कमाई
८९६७१
तीन सुवर्ण, सहा रौप्य, तीन कांस्य पदकांची कमाई
युवा तायक्वॉंदो क्लबः राज्यातील ६०० खेळाडूंचा सहभाग
रत्नागिरी, ता. १७ ः ३२वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वॉंदो अजिंक्यपद स्पर्धा डेरवण क्रीडा संकुलात सुरू आहे. या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वॉंदो ट्रेनिंग सेंटर ओमसाई मित्रमंडळ येथील तायक्वॉंदो तीन सुवर्ण, सहा रौप्य, तीन कांस्यपदके पटकावली.
या स्पर्धेत यश संपादन केलेले पदकप्राप्त खेळाडू असेः संस्कृती सपकाळ (सुवर्ण), स्वरा साखळकर (सुवर्ण), मंथन आंबेकर (सुवर्ण), अस्मी साळुंखे (रौप्य), ओवी काळे (रौप्य), उपर्जना कररा (रौप्य), सार्थक गमरे (रौप्य), युसुफ मोगल (रौप्य), स्वरा साखळकर (रौप्य), आस्मी साळुंखे, आराध्य तहसीलदार (कांस्य), ओवी काळे (कास्य). या सर्व विजेते खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा व सहप्रशिक्षक तेजकुमार लोखंडे, अमित जाधव, महिला प्रशिक्षक शशीरेखा कररा, प्रतीक पवार यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील पदकप्राप्त खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर सर्व पदाधिकारी तसेच तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन वेंकटेश्वरराव कररा, जिल्हा महासचिव लक्ष्मण कररा, शशांक घडशी, राम कररा यांनी अभिनंदन केले.