
करिअर संधी विषयावर रविवारी मोफत समुपदेशन
करिअर संधी विषयावर
रविवारी मोफत समुपदेशन
लांजाः दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक, सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व शाळांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकरिता लांजा तालुका मुख्याध्यापक संघ, संस्कृती फाउंडेशन लांजा - रत्नागिरी तसेच एमकेसीएल जिल्हाप्रमुख केंद्र कोलते कॉप्युटर, रत्नागिरी यांच्यावतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदललेली शिक्षणपद्धती व मेगा ट्रेंडनुसार भविष्यातील करिअरच्या संधी या विषयावर मोफत समुपदेशन कार्यक्रम रविवारी (ता. १९) सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत अजिंक्य मंगल कार्यालय, केदारलिंग मंदिराशेजारी, लांजा येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पालक व नागरिकांसाठी विनामूल्य आहे. आपल्या पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी हे समुपदेशन खूप मार्गदर्शक ठरणार असून, याचा लाभ तालुक्यातील पालक तसेच सुजाण नागरिकांनी घेण्याचे आवाहन लांजा तालुका माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, संस्कृती फाउंडेशन आणि कोलते कॉम्प्युटर यांनी केले आहे.
---------------------
शॉपिंग कार्निव्हलतर्फे
प्रदर्शन व विक्री
रत्नागिरीः शॉपिंग कार्निव्हल वसंतोत्सवतर्फे येत्या २४ ते २६ या कालावधीत सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत जोगळेकर हॉल, दामले विद्यालय रोड, मारूती मंदिर येथे मराठी नववर्षांचे स्वागत करून या वर्षांतले पहिले प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले आहे. मराठी नववर्षाचे स्वागत करून शॉपिंग कार्निव्हलच्या प्रदर्शनात प्रामुख्याने स्थानिक महिला उद्योजिकांकडून विक्रीसाठी सुंदर वस्तू ठेवल्या आहेत. तसेच या प्रदर्शनात हॅण्डमेड व हॅन्डक्राफ़्टेड प्रोडक्ट्स बघण्याची व खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. होमडेकोर, ज्वेलरी, एथनिक साडी अँड ड्रेस मटेरियल, बॅग्स अँड पर्सेस, फॅशनवेअर, खाद्यपदार्थ या आणि अशा विविध उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाला नातेवाईक व मित्रपरिवारासोबत सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे शॉपिंग कार्निवलच्या टीमकडून आवाहन केले आहे.
----------