Thur, June 1, 2023

नेमळे वेत्ये रस्ता डांबरीकरण काम सूरू
नेमळे वेत्ये रस्ता डांबरीकरण काम सूरू
Published on : 17 March 2023, 12:46 pm
89751
नेमळे ः कामाची पाहणी करताना संबंधित.
नेमळे वेत्ये रस्त्याचे
डांबरीकरण काम सुरू
सावंतवाडी, ता. १७ : तालुक्यातील नेमळे मळगाव वेत्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुक्रवारी प्रारंभ करण्यात आला. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप नेमळेकर, माजी सभापती राजेंद्र परब, सरपंच सौ. स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गावकर, कार्यकर्ते दीपक जोशी, विश्वनाथ गोसावी, सागर राणे, दत्तप्रसाद नाईक आदी उपस्थित होते.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागच्या बजेटमधून मंजूर असून या रस्त्याच्या दोन किलोमीटरच्या कामासाठी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे नूतनीकरण मंजूर करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.