ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध
ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध

ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध

sakal_logo
By

-rat१७p३२.jpg ः
८९७२९
खेड ः ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करताना माजी आमदार संजय कदम सोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी.
--
ईडीच्या कारवाईचा ठाकरे गटाकडून निषेध

खेड, ता. १७ ः उद्योजक सदानंद गंगाराम कदम यांच्यावर राजकीय वैमनस्यातून लावण्यात आलेल्या ईडी कारवाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेडच्यावतीने निषेध करण्यात आला. कोकणातील प्रतिष्ठित उद्योजक सदानंद कदम यांनी त्यांच्या हॉटेल व केबल व्यवसायाच्या माध्यमातून खेड दापोलीमधील असंख्य तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्टप्रकरणी राजकीय सूडबुद्धीने ईडीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे दापोली, मुरूड, हर्णै येथील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही राजकीय वैमनस्यातून लावण्यात आलेली ईडीची चौकशीची कारवाई निंदनीय आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेडच्यावतीने निषेध व्यक्त करणारे पत्र खेड पोलिस ठाणे, प्रांताधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी खेड यांना देण्यात आले. या वेळी दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख संदीप कांबळे, युवासेना उपजिल्हाधिकारी तथा शिवसेना शहरप्रमुख दर्शन महाजन, तालुका सचिव मनोज भोसले, विभागप्रमुख विश्वास कदम, विभागप्रमुख अंकुश कदम, विनय तोडणकर, गौरव तोडकरी, मधुर चिखले, दत्ता भिलारे, ज्ञानदेव निकम तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.