पावस स्वरुपानंद विद्यामंदिरला माजी विद्यार्थ्यांची लाखोंची मदत

पावस स्वरुपानंद विद्यामंदिरला माजी विद्यार्थ्यांची लाखोंची मदत

89734

स्वरुपानंद विद्यामंदिरला माजी विद्यार्थ्यांची लाखोंची मदत
कृतज्ञता सोहळा ; सभागृहासाठी देणगी, शाळेसाठी दिले पाच लाख
पावस, ता. १७ः स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरच्या तीन माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिलेल्या देणगीबद्दल त्यांचा कृतज्ञता सोहळा विद्यामंदिरमध्ये करण्यात आला.
पावस प्रशालेमध्ये माजी विद्यार्थी विनायक फडके, लहू पावसकर, विनायक दाबके यांनी शाळेला मोलाची मदत केली होती. याबाबत डॉ. फडके यांनी सांगितले, ज्या प्रशालेच्या भूमिपूजनाची कोनशिला स्वामी स्वरूपानंदांनी घातली त्या प्रशालेत शिकण्याचे मला भाग्य मिळाले. त्या प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी म्हणून मुंबई विद्यापिठामध्ये भूगोल विषयाचा अधिव्याख्याता आणि विभागप्रमुख म्हणून काम करण्याची मला संधी प्राप्त झाली. त्या माझ्या प्रशालेतील सर्व गुरूजनांच्या आठवणी म्हणून त्यांच्या नावाने एका सभागृहासाठी देणगी देण्याचा मानस माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून होता, त्याला आज मूर्त रूप देऊ शकलो याचा मला आनंद होत आहे.
प्रशालेचे माजी विद्यार्थी लहू पावसकर यांनी पोस्ट विभागामध्ये नोकरी करत असताना आपल्या आईच्या आजारपणाच्या सेवेसाठी नोकरीचा त्याग केला. पावसकर यांनी शाळेला तब्बल ५ लाख रुपयांची देणगी देऊ केली. तसेच पावसचे ग्रामदैवत नवलादेवी मंदिर कलश जीर्णोद्धारासाठी ३ लाख रुपयांची मदत केली. गेल्या आठ वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यासाठी देणगीरूपाने मदत करणारे विनायक दाबके यांनी शाळेसाठी भरीव प्रकारच्या ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून शाळेतील जवळपास १ हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना अन्नदान करण्याचा मानस देणगी रूपातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने यी तीन दात्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन लोकल कमिटीचे सचिव हरीश सामंत यांनी केले. प्रास्ताविक लोकल कमिटी अध्यक्ष माधव पालकर यांनी केले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष सामंत यांनी पावसकर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. संस्थेचे सहसचिव सुरेश गुरव यांनी दाबके आणि फडके यांना सन्मानित केले. मुख्याध्यापक बाबासाहेब माने, विनायक भाटकर, माजी मुख्याध्यापक अशोक कामत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com