आहारावर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आहारावर मार्गदर्शन
आहारावर मार्गदर्शन

आहारावर मार्गदर्शन

sakal_logo
By

आयसीएसमध्ये महिलांच्या आहारावर मार्गदर्शन

खेड ः जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे येथील आयसीएस महाविद्यालयात महिलांचे विविध आजार व विशेष आहार या संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी डॉ. वैदही शेळके, डॉ. शुभांगी राठोड यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. खेड जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्यावतीने डॉ. राठोड, डॉ. मनिषा कानडे, डॉ. शामिका तलाठी, डॉ. शेळके, डॉ. रोहिणी जोशी, डॉ. अर्चना स्वामी, डॉ. मधुरा बाळ, डॉ. आकांक्षा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अजित भोसले, सचिव डॉ. प्रवीण राठोड, मार्गदर्शक डॉ. श्याम गिल्डा, डॉ. परेश मळणगावकर, वैद्य समीर तलाठी, डॉ. दीपक मोरे, डॉ. सिद्धेश चिखले, डॉ. आदेश भोसले, डॉ. नीलेश भोसले, डॉ. विलायत मुकादम, प्रभारी प्राचार्य डॉ. एच. पी. थोरात, प्रा. डॉ. अनिता आवटी, प्रा. साळुंखे आदी उपस्थित होते.

--
८९७४०
खेड ः जामगे येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या बिजघर गावातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम.
--
बिजघरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार

खेड ः तालुक्यातील बिजघर टाकेवाडी व तांबटवाडी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १७) खेड तालुक्यातील जामगे येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांनी त्यांचे स्वागत केले. खेड तालुक्यातील बिजघर गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून टाकेवाडी व तांबटवाडी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांची जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते आत्माराम लाहीम, महेंद्र राणे, मनीषा राणे, दीपाली कदम, अपर्णा कदम, विशाल झुजम, नागेश भोसले, संदेश राणे, सोनाली राणे, शोभा झुजम, संदीप कदम, शैलेश राणे, भगवान घडशी, अभिजित घडशी, सिद्धेश घडशी, अस्मिता घडशी, तुळशीराम विचारे आदींनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे सांगितले.
-
गोगटेमध्ये उद्या रोजगार मेळावा

रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात रविवारी (ता.१९) सकाळी १० वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात या मेळाव्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.