
गणित प्रज्ञा परीक्षेत बांदा केंद्रशाळेचे यश
टीपः swt१७२२.jpg मध्ये फोटो आहे.
बांदा : केंद्रशाळेत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर व शिक्षक.
गणित प्रज्ञा परीक्षेत
बांदा केंद्रशाळेचे यश
बांदा, ता. १७: महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेतील पाचवीतील पुर्वा हेमंत मोर्ये व शिवानंद संतोष परब परब हे दोन विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत शाळेतील युवराज मिलिंद नाईक, अनुष्का भगवान झोरे व अनुज दिलीप कदम हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षी गणित अध्यापक मंडळाच्या वतीने गणित संबोध, प्रावीण्य व प्रज्ञा परीक्षा घेण्यात येतात. गणित प्राविण्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरीय प्रज्ञा परीक्षेला बसण्याची संधी मिळते. या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, केंद्र प्रमुख संदीप गवस यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रशांत पवार, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, जागृती धुरी, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, गोपाळ साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.