जुन्या पेन्शनसाठी आज खेडमधून निघाली पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या पेन्शनसाठी आज खेडमधून निघाली पदयात्रा
जुन्या पेन्शनसाठी आज खेडमधून निघाली पदयात्रा

जुन्या पेन्शनसाठी आज खेडमधून निघाली पदयात्रा

sakal_logo
By

८९७३९
----------
जुन्या पेन्शनसाठी खेडमध्ये पदयात्रा
खेड, ता. १७ः जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी १४ मार्च पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्रभर सर्व क्षेत्रातील कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. शुक्रवारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना तसेच सर्व सरकारी-निमसरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली.
ही यात्रा खेड पंचायत समितीपासून सुरू झाली. खेड बाजारपेठ, तीनबत्ती नाका, तळ्याचे वाकण, सिद्धिविनायक मंदिरवरून कन्याशाळामार्गे पुन्हा पचायंत समितीमध्ये आली. या वेळी तळ्याच्या वाकण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. गुरुवारी (ता. १६) बाईक रॅली काढण्यात आली आणि शुक्रवारी (ता. १७) पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. या वेळी घोषणा देत शहर परिसर दणाणून गेला होता.
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी १४ मार्च २०२३ पासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांची दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेत संवाद साधला व ठाकरे गटातर्फे बेमुदत संपाला पाठिंबा दर्शवला. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मनसे नेते वैभव खेडेकर यांनीही संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.