
गटार बांधकामाचा बांद्यात प्रारंभ
89769
बांदा ः येथे कामाचा प्रारंभ करताना श्रीकृष्ण शिरसाट. शेजारी भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)
गटार बांधकामाचा
बांदा येथे प्रारंभ
बांदा, ता. १७ ः बांदा नाबर शाळा ते तलाठी कार्यालयापर्यंत गटार बांधकामाचा आज ज्येष्ठ व्यापारी श्रीकृष्ण उर्फ भाई शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.
१४ व्या वित्त आयोग निधीतून या कामासाठी २ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, उद्धव ठाकरे गट शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, शामसुंदर मांजरेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, भाजपा शहर प्रमुख बाबा काणेकर, शैलेश केसरकर, सुधीर शिरसाट, अक्षय मयेकर, गुरुदास धारगळकर, मिलिंद सावंत, प्रथमेश गोवेकर, अनुप पावसकर, अर्णव स्वार, प्रशांत कोचरेकर, भाऊ वाळके, तुषार परब, पांडुरंग नाटेकर, अर्चना सावंत, भाजपा महिला शहर प्रमुख अवंती पंडित आदी उपस्थित होते.