तिरवडे ग्रामपंचायत व्यवहारांची चौकशी करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरवडे ग्रामपंचायत व्यवहारांची चौकशी करा’
तिरवडे ग्रामपंचायत व्यवहारांची चौकशी करा’

तिरवडे ग्रामपंचायत व्यवहारांची चौकशी करा’

sakal_logo
By

टीपः swt१७२७.jpg मध्ये फोटो आहे.
तिरवडे ः गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देताना सरपंच, सदस्य व ग्रामस्थ.


ग्रामपंचायत व्यवहारांची चौकशी करा

तिरवडेवासीयांची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : तिरवडे ग्रामपंचायत येथील डिसेंबर २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या कामकाजाची व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ग्रामपंचायत खात्यात केवळ सातशे रुपये शिल्लक ठेवले होते. ग्रामपंचायत तिरवडेची अनेकांची बिले देणे बाकी आहे. कर्मचारी पगार थकले आहेत. पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. १५ टक्के व ५ टक्के निधीतून करायचा खर्च बाकी आहे; मात्र ग्रामपंचायतीकडे पैसेच नाहीत, अशी स्थिती आहे. यांसह अनेक मुद्दे गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांच्याकडे मांडण्यात आले. २०१७ पूर्वी जी ग्रामपंचायत बॉडी होती, तिचा कार्यकाळ संपला होता. तेव्हा सुमारे अडीच लाख रक्कम ग्रामपंचायत खाती होती; मात्र मागील बॉडीत सगळाच खडखडाट असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या उपस्थितीत सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, सदस्य विशाखा गावडे, सुमित मेस्त्री, विनया गावडे, माजी सदस्य विकास गावडे, जयेंद्ररथ परब, संतोष गावडे, दयानंद गावडे, उमेश गावडे, प्रथमेश पोरकर, गाव अध्यक्ष रामचंद्र सावंत आदी उपस्थित होते.