
गुढीपाडव्यानिमित्त देवगडात शोभायात्रा
गुढीपाडव्यानिमित्त देवगडात शोभायात्रा
देवगड ः येथील देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळाच्यावतीने हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधून बुधवारी (ता. २२) दुपारी ४.३० वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. देवगड किल्ला ते स्वामी समर्थ मंदिर असा याचा मार्ग असेल. या दिंडीत चित्ररथ, ढोलपथक, लेझीम पथक, कराटे प्रात्यक्षिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
बांदा आठवडा बाजार उद्या
बांदा : शहराची रंगपंचमी (शिमगोत्सव) सोमवारी( ता. २०) असल्याने आठवडा बाजार सोमवार ऐवजी एक दिवस अगोदर रविवारी (ता. १९) भरविण्यात येणार आहे. तरी बांदा परिसरातील गावातील छोटे शेतकरी व्यवसायिक, भाजी विक्रेते, बांदा व्यापारी, सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन बांदा व्यापारी सघांचे अध्यक्ष प्रसाद पावसकर यांनी केले आहे.