अबोली ऑटो रिक्षा योजनेचा आज जिल्हा बँकेतर्फे प्रारंभ

अबोली ऑटो रिक्षा योजनेचा आज जिल्हा बँकेतर्फे प्रारंभ

अबोली ऑटो रिक्षा योजनेचा
आज जिल्हा बँकेतर्फे प्रारंभ
ओरोस, ता. १७: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदर्ग जिल्हा बँकेने माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा हि महत्त्वकांशी योजना हाती घेतली आहे. या योजनेचा प्रारंभ उद्या ( ता. १८) दुपारी ३ वाजता सौ. नीलम राणे यांच्या हस्ते तर बँकेचे संचालक आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. या वेळी ३ महिलांना अबोली रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
या योजनेच्याद्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसाहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार राणे स्वतः करणार आहेत.
जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९ टक्के सवलतीच्या दरात कर्ज जाहीर केले असून किमतीच्या ८५ टक्के कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे. उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नीतेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच, रिक्षा परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नीतेश राणे हे करणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या साडेपाच लाख आहे. ही संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे लोकसंख्येने जास्त असलेल्या महिला जिल्ह्याच्या उद्योग व्यवसायात अर्थकारणात पुरुषांच्या तुलनेने दिसत नाहीत. महिलांचा हा सहभाग वाढावा त्यांनी आत्मविश्वासाने पुढे यावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. तोच उद्देश ठेवून जिल्हा बँकेने ही अबोली ऑटो रिक्षा योजना अमलात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यातून जिल्ह्यातील महिलांची हिम्मत वाढावी, त्या कष्टाने पुढे याव्यात हाच बँकेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यात विमानतळ, मोठ मोठे हॉटेल सुरू होत आहेत. विविध प्रकल्प येऊ घातले आहेत. विकासाच्या या पर्यायाला महिलांची साथ लाभावी व त्यानी हा विकास साधला जात असताना महिलांना रोजगार मिळावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना पुढे आणली जात आहे, असे दळवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com