चिपळूण-तरुणीला गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-तरुणीला गंडा
चिपळूण-तरुणीला गंडा

चिपळूण-तरुणीला गंडा

sakal_logo
By

चिपळुणातील तरुणीला ७८ हजारांचा गंडा

चिपळूण, ता. १७ : गिफ्ट लागल्याचे सांगून चिपळुणातील एका तरुणीला ७८ हजार १८५ रुपयाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सायली चिपळूणकर असे फसवणुक झालेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार १४ मार्च दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत घडला. याप्रकरणी रजत अग्रवाल (पूर्ण नाव माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूणकर यांना १४ मार्चला फोन आला. फोनवर हिंदी भाषेतून संभाषण करत ''मी अर्थ कंपनीतून बोलत आहे. तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर असल्याने तुम्हाला एसी, वन प्लसचा फोन, लॅपटॉप, टीव्ही, फ्रीज, असे गिफ्ट लागले आहे. त्यातले तुम्हाला काय पाहिजे'' अशी विचारणा केली. सायलीने सोनीचा टीव्ही पाहिजे, असे सांगताच त्यासाठी तुम्हाला अर्थ कंपनीकडून काही तरी खरेदी करावी लागेल, असे सांगण्यात आले. खरेदीचे पेमेंट युनियन बॅंकेच्या खात्यावर करा, असेही सांगण्यात आले. त्यानंतर चिपळूणकर यांनी ऑनलाईन एकूण ७८ हजार १८५ रुपये ट्रान्स्फर केले. ही रक्कम पाठविल्यानंतर कोणत्याही प्रकारची वस्तू देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिपळूणकर यांनी अलोरे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.