Fri, June 2, 2023

नीलेश राणे यांचे भाजपतर्फे स्वागत
नीलेश राणे यांचे भाजपतर्फे स्वागत
Published on : 17 March 2023, 2:11 am
89783
दाबोळी गोवा : येथे माजी खासदार नीलेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना उपसरपंच जावेद खतीब. शेजारी भाजप पदाधिकारी.
नीलेश राणे यांचे भाजपतर्फे स्वागत
बांदा, ता.१७: माजी खासदार तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश सचिव डॉ. निलेश राणे यांना दाबोळी (गोवा) विमानतळवर जिल्हा भाजपाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच जावेद खतीब यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी भाजपचे शहरातील पदाधिकारी शामसुंदर मांजरेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, संदीप बांदेकर, हुसेन मकानदार, साईनाथ धारगळकर आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन श्री राणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.