‘शिवगर्जना’ला दिमाखात सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिवगर्जना’ला दिमाखात सुरुवात
‘शिवगर्जना’ला दिमाखात सुरुवात

‘शिवगर्जना’ला दिमाखात सुरुवात

sakal_logo
By

89798
89799
कुडाळ : ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाचे उद्‍घाटन हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. शेजारी विशाल परब. दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित शिवप्रेमींचा जनसमुदाय. (छायाचित्रे ः अजय सावंत)


‘शिवगर्जना’ला दिमाखात सुरुवात

कुडाळात आयोजन; माजी खासदार नीलेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य

कुडाळ, ता. १७ : भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील हायवेलगतच्या एसटी डेपो मैदानावर आज शिवगर्जना या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत दिमाखात सुरुवात झाली.
या नाट्यप्रयोगाला शिवप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवित प्रत्यक्ष शिवजन्मोत्सव, शिवराज्याभिषेकासह शिवरायांचा इतिहास याची देही याची डोळा पाहिला. एकुणच शिवप्रेमीसाठी कुडाळ एसटी आगारावरील आजची रात्र ‘शिवगर्जना’ नाट्यप्रयोगामुळे यादगार ठरली. विशाल सेवा फाउंडेशनच्या पुढाकाराने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. याचे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे, नीलम राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, सौ. वेदिका विशाल परब, पद्मश्री परशुराम गंगावणे, भाजप ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, अशोक सावंत, विनायक राणे, दीपक नारकर, बंड्या सावंत, रूपेश कानडे, पप्या तवटे आदी उपस्थित होते.
‘शिवगर्जना’चे सादरीकरण सायंकाळी पाच पासून सुरू झाले. त्यानंतर काही वेळातच मैदान शिवप्रेमींनी भरुन गेले. या महानाट्यासाठी दोनशे फुट लांबीचा प्रशस्त असा देखना रंगमंच, समोर व्हीआयपीसह भव्य बैठक व्यवस्था केली होती. मैदानात प्रशस्त अशा सहा स्क्रीन लावल्या होत्या. दरम्यान, ‘विशाल परब आगे बढो हम तुमारे साथ है’ म्हणत ‘मालवणी माणूस दिलदार असता. आजचो कार्यक्रम सुद्धा विशाल आसा’, असे सांगत विशाल परब यांना दिगंबर नाईकांनी शुभेच्छा दिल्या.
---
चौकट
राणे पितापुत्राची दमदार एन्ट्री
आज सायंकाळी महानाट्याच्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे, नीलम राणे, आमदार नितेश राणे यांची इलेट्रिक मोटारीमधून दमदार एन्ट्री झाली. भव्य रंगमंचाच्या ठिकाणी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.