भाजपने उभारलेली मिनी चौकी हटवली

भाजपने उभारलेली मिनी चौकी हटवली

89800
सावंतवाडी : नगरपालिकेसमोर उभारण्यात आलेली मिनी पोलिस चौकी हलवताना पालिका कर्मचारी.


भाजपने उभारलेली चौकी हटवली

सावंतवाडी पालिका प्रशासनाची कारवाई

सावंतवाडी, ता. १७ : माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख यांनी नगरपालिकेसमोर मोती तलावाच्या पदपथावर उभारलेली पत्र्याची मिनी पोलिस चक्क काही तासातच पालिका प्रशासनाने हटविली. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून पोलिस ठाण्यात रितसर तक्रारही करण्यात आली. एकूणच या प्रकाराने शहरात पुन्हा एकदा राजकारण पेटणार असल्याची चर्चा आहे.
मोती तलावाच्या पदपथावर नगरपालिकेसमोर आज सकाळी भाजपचे अल्पसंख्यांक उपाध्यक्ष श्री शेख यांच्या पुढाकारातून वाहतूक पोलिसांसाठी पत्र्याची शेड उभारली होती. सावंतवाडी पोलिस ठाणे अंतर्गत बाजारपेठ पोलिस चौकी असे नामकरणही केले होते. माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फीत कापून या चौकीचा प्रारंभ केला होता; मात्र अवघ्या काही तासांतच थेट प्रशासनाकडून यावर कारवाई करत ही शेड तेथून हटवण्यात आली. माजी नगराध्यक्ष श्री परब यांना यासंदर्भात विचारले असता या संदर्भात तसा ठराव घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृतरित्या ही शेड असल्याचे त्यांनी सांगितले होते; परंतु यासंदर्भात पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर यांना विचारले असता त्यांनी ही कारवाई पालिका प्रशासनाने नव्हे तर पोलिसांनीच केल्याचे सांगत अधिक माहिती मुख्याधिकाऱ्यांनाच विचारा असे सांगितले; मात्र मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com