
बापर्डे दुहेरी खूनातील संशयितास न्यायालयीन कोडठी
बापर्डे दुहेरी खूनातील
संशयितास कोडठी
देवगड, ता. १७ ः बापर्डे बौद्धवाडी (ता.देवगड) येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित भारत मुरारी सकपाळ (वय ४९) याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोडठी सुनावली. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. आता त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी दिली.
संशयिताने जेवण खाणे देत नसल्याच्या रागातून आपला मोठा भाऊ महेंद्र सकपाळ (वय ५६) आणि वयोवृद्ध आई शोभा सकपाळ (वय ७०) यांचा खून केला होता. याप्रकरणी येथील पोलिसांनी संशयितावर खूनाचा गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला आजपर्यंत (ता.१७) पोलिस कोठडी सुनावली होती. त्याच्या कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बगळे यांनी दिली.