सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श जपा

सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श जपा

89845
कट्टा ः वेशभूषा व पाककला स्पर्धेतील विजेते, सहभागी स्पर्धकांसोबत नितीन वाळके, अॅड. समृध्दी म्हाडगुत, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर व अन्य.

सावित्रीबाईंच्या कार्याचा आदर्श जपा

नितीन वाळके; कट्टा सेवांगणमध्ये पुण्यतिथीनिमित्त वंदन

ओरोस, ता. १८ ः १८५७ च्या बंडानंतर प्रतिकूल स्थितीत सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, बालविधवा, प्लेग रुग्णांची सेवा क्षेत्रांत अजोड कामगिरी केली. महिलांच्या प्रगतीसाठी त्यांनी सोसलेले त्रास, सहन केलेला विरोधाचा भडिमार याची जाणीव महिला वर्गाने ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक नितीन वाळके यांनी केले. कट्टा (ता. मालवण) येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे सावित्रीबाई पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या वतीने महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी वाळके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा सखोल आढावा घेतला. अॅड. समृद्धी म्हाडगुत यांनी महिलांनी स्वतः सक्षम होऊन आपला विकास करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला किमान कायदे विषयक ज्ञान अवगत असायला हवे. आपल्या हक्कांविषयी प्रत्येक महिलेने जागरूक असायला हवे, असे मार्गदर्शन केले. त्यासाठी सेवांगण अनेक उपक्रम राबवित असून त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सायली चव्हाण यांनी कार्यक्रमास महिलांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील स्त्री असेल त्या स्थितीत विविध स्पर्धांत सहभागी होऊन आनंद घेत आहे, याचे कौतुक करून महिलांनी आपल्या मुलांना सर्वांगीण प्रगतीसाठी सक्षम करावे, असे आवाहन केले. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी कट्टा शाखेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. प्रियांका भोगटे यांनी पाककला स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचे कौतुक करून सार्‍याच पाककाला उत्कृष्ट होत्या; पण अगदी थोड्या गुणांनी काही जणींचा नंबर पुढे गेला, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ नांदोसकर व वैष्णवी लाड यांनी केले. या कार्यक्रमाला किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, मधुरा माडये, गीता नाईक, हरेश चव्हाण, सुनील चव्हाण, सुजाता पावसकर तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
.............
चौकट
स्पर्धांतील विजेत्या महिलांचा गौरव
यावेळी सेवांगणच्यावतीने घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धा व पाककला स्पर्धेतील विजेते व सहभागी महिलांचा प्रशस्तिपत्रक व भेटवस्तू देऊन मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com