रत्नागिरीत 24 ला करिअर मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत 24 ला करिअर मार्गदर्शन
रत्नागिरीत 24 ला करिअर मार्गदर्शन

रत्नागिरीत 24 ला करिअर मार्गदर्शन

sakal_logo
By

-rat१८p८.jpg-
८९८३२
प्रा. विजय नवले
--
रत्नागिरीत शुक्रवारी करिअर मार्गदर्शन

रत्नागिरी, ता. १८ ः बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेने येत्या २४ मार्चला मोफत समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे. एक पाऊल उज्ज्वल भविष्याच्या दिशेने या समुपदेशन व बारावीनंतर विविध क्षेत्रातील सुवर्णसंधींवर मार्गदर्शन कार्यक्रमात करिअर पाथ निर्मितीमध्ये विश्वविक्रम करणारे प्रा. विजय नवले मार्गदर्शन करणार आहेत.
२४ मार्चला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जि. प. जवळील मराठा भवन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. प्रा. नवले यांनी गेल्या २३ वर्षांत राज्यभरात ३५०० हून अधिक करिअर व्याख्याने दिली आहेत. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती वक्तृत्वशैली, रंजक किस्से ते व्याख्यानादरम्यान सांगतात. त्यांनी सुमारे २६०० कार्यक्षेत्रांचा सूक्ष्म अभ्यास करून ६७ हजार १०० करिअर मार्गांचे संशोधन केले. संपूर्ण जगात असा अभ्यास व करिअर मार्गांची तक्ता स्वरूपात प्रथमच निर्मिती केल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने या विक्रमाची नोंद करून सन्मानित केले आहे. दै. सकाळ व अन्य विविध वृत्तपत्रांमध्ये करिअरविषयक विपुल लेखन केले आहे. आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध वृत्तवाहिन्यांवरूनही ते करिअर मार्गदर्शन करतात. करिअर निर्णय या जगातील पहिल्या करिअर कॅलेंडरचे लेखन व संपादन प्रा. नवले यांनी केले आहे.