तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला भारत सरकारची मान्यता

sakal_logo
By

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाला मान्यता

अविनाश बरगजे ; संघटनेतील वादाचा खेळाडूंवर परिणाम

चिपळूण, ता. २० ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेला भारत सरकारने मान्यता दिली. यापुढे तायक्वांदो देशात अधिक गतिमान व पारदर्शक कार्यप्रणाली राबवणार असल्याची माहिती राज्य संघटना अध्यक्ष डॉ. अविनाश बरगजे यांनी दिली.
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व वालावलकर क्रीडासंकूल डेरवण आयोजित सबज्युनिअर स्पर्धा उद्घाटनप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, देशपातळीवर क्रीडा संघटनामध्ये वाद निर्माण झाल्यास त्याचे परिणाम पालक आणि खेळाडू यांच्या मानसिकतेवर होत असतात. पडद्यामागे पदाधिकारी कायदेशीर संघर्ष करत असतात. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेला भारत सरकारने मान्यता दिली.
राष्ट्रीय संघटनेत सतत दहा वर्ष कोषाध्यक्ष राहिलेल्या विनायक गायकवाड यांचे निधन झाल्याने राज्य स्पर्धाप्रसंगी ५००हून अधिक खेळाडू, प्रशिक्षक यांनी श्रद्धांजली अर्पण केली. फेडरेशन सदस्य मिलिंद पठारे यांनी राज्यात रत्नागिरी जिल्हा संघटना सन २००२ पासून आजपर्यंत शिस्तबद्ध जिल्हा संघटना म्हणून दिशादायक काम करत असल्याचे सांगितले. राज्य संघटनेत व्यंकटेशराव कररा यांचा अनुभव निर्णायक ठरल्याने त्यांची खजिनदारपदी निवड झाल्याचे स्पष्ट केले. या वेळी आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कारविजेते प्रवीण बोरसे, अजित घार्गे, सतीश खेमस्कर हे राज्य कार्यकारिणी, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, जिल्हा संघटनेचे मयूर खेतले, विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, लक्ष्मण कररा, संजय सुर्वे या वेळी उपस्थित होते.