
-हर्षदा खानविलकर ठरल्या स्वच्छता क्विन
89838
राजापूर ः ‘स्वच्छता क्विन’ या प्रश्नमंजूषा विशेष कार्यक्रमाच्या मानकरी हर्षदा खानविलकर यांच्यासह अन्य स्पर्धक महिला.
-----------
हर्षदा खानविलकर ठरल्या स्वच्छता क्विन
महिलांसाठी फनीगेम्स ; उत्स्फूर्त सहभागाने स्पर्धांमध्ये रंगत
राजापूर, ता. 18 ः राजापूर नगर पालिका, महिला व बालकल्याण विभाग आणि दीनदयाळ अंत्योदय विभाग यांच्यावतीने महिलांसाठी विविध फनीगेम्स आणि क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी क्रीडांगणावर रंगलेल्या या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेंतर्गत झालेल्या ‘स्वच्छता क्विन’ या प्रश्नमंजुषा विशेष कार्यक्रमाच्या हर्षदा खानविलकर मानकरी ठरल्या.
राजीव गांधी क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेचा आरंभ प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांच्यासह पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी महिलांना मार्गदर्शन केले. पालिकेचे बांधकाम अभियंता संजीव जाधव, पाणीपुरवठा व आरोग्य पर्यवेक्षक श्रेया शिरवटकर, अविनाश नाईक, अनुष्का जुवेकर, पूर्वा कांबळे, संदेश जाधव, प्रमित जाधव आदी उपस्थित होते.
या वेळी घेण्यात आलेल्या चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये सोनाली मांडवे, प्राची शेलार, फिरोजा मुल्ला यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. फनी गेम्समध्ये संध्या पंडित, उन्नती मंचेकर, नेहा खानविलकर यांनी तर संगीत खुर्ची स्पर्धेत शुभांगी सोलगावकर, नेहा जावकर, आकांक्षा खटावकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. सर्व विजेत्यांना रोख रक्कमेसह सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. लहान मुलींमध्ये रिया जानस्कर, वैष्णवी पाटील व वैभवी भामद्रे यांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी प्रदीप निकम, अशोक दुदम, अविनाश नाईक यांनी काम पाहिले.