Wed, June 7, 2023

महिला रुग्णालयात लवकरच पदभरती
महिला रुग्णालयात लवकरच पदभरती
Published on : 18 March 2023, 10:59 am
‘महिला रुग्णालयात लवकरच भरती’
कुडाळ ः तालुक्यातील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील पदभरती १५ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. विधानसभा आमदार वैभव नाईक यांनी येथील महिला व बाल रुग्णालयातील प्रलंबित समस्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावर मंत्री डॉ. सावंत म्हणाले, या रुग्णालयासाठी ९७ नवीन पदे निर्माण केली असून पैकी ६८ पदे भरली आहेत. उर्वरित २९ पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा पुरवठा, तसेच इतर सुविधा उपलब्ध होण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल. अनेक दिवसांपासून या रुग्णालयात वैद्यकीय पदे रिक्त असल्याने गैरसोय होत आहे.