दिलीप वेंगसरकर संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप वेंगसरकर संघ विजेता
दिलीप वेंगसरकर संघ विजेता

दिलीप वेंगसरकर संघ विजेता

sakal_logo
By

89877
मालवण ः ४० वर्षांवरील टेनिस क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर संघाने विजेतेपद पटकावले.

दिलीप वेंगसरकर संघ विजेता

मालवणात ४० वर्षांवरील क्रिकेट स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : तालुका सभासदांसाठी मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन आयोजित ४० वर्षांवरील टेनिस क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर संघ अंतिम विजेता, तर रॉजर बिन्नी संघ उपविजेता ठरला.
येथील बोर्डिंग ग्राउंड येथे ४० वर्षांवरील तालुका सभासदांसाठी आयोजित या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले. अंतिम सामन्यात कर्णधार सुशील शेडगे यांच्या दिलीप वेंगसरकर संघाने उमेश मांजरेकर यांच्या रॉजर बिन्नी संघावर ३ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदिवे, खजिनदार बबन परब, सेक्रेटरी सुनील धुरी, तालुकाध्यक्ष रिझवान शेख, रामा शेटये, पपू परब, विक्रम मोरे, महेश कांदळगावकर उपस्थित होते. या स्पर्धेत मालिकावीर नितीन झाड, उत्कृष्ट फलंदाज नितीन परुळेकर, तर उत्कृष्ट गोलंदाज सागर वाईरकर यांची निवड झाली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक देण्यात आले. जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष हळदिवे यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील ४० वर्षांवरील क्रिकेटपटूंना एकत्र आणण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येत्या काही दिवसांत तालुका सभासदांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे तालुका हौशी असोसिएशन अध्यक्ष रझवान शेख म्हणाले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तालुका असोसिएशन पदाधिकारी, सदस्य, क्रिकेट प्रेमी यांनी मेहनत घेतली.