सर्पाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पाला जीवदान
सर्पाला जीवदान

सर्पाला जीवदान

sakal_logo
By

खेर्डी एमआयडीसीत सर्पाला वनविभागाकडून जीवदान

चिपळूण ः चिपळूण शहरातील खेर्डी एमआयडीसी येथे दीपक शिराप यांच्या बेकरीत नाग प्रजातीचा साप असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून जीवनदान देण्यात आले. हे बचावकार्य परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली कोळकेवाडी वनरक्षक राहुल गुंडे व वाळा शिके यांनी केले.
-
सापाला वनविभागाच्या पथकाने पकडली

खेड ः खेड मधील शिवतर येथे घरात धामण साप असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला मिळाली. वनविभागाचे कर्मचारी बचावकार्यात खेड वनरक्षक बगेकर यांनी सर्वेश पवार, रोहन खेडेकर, सुरज जाधव यांच्या मदतीने धामण सापाला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. हे बचावकार्य परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तसेच खेड भडगांव येथे घरात शिरलेला घोणस वनविभागाच्या पथकाने पकडले. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात असलेले वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ माहिती देण्याकरिता वनविभागाच्या १९२६ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन वनविभागामार्फत केले आहे.
-

शेततळ्यातील खवले मांजराचे केले रेस्क्यू

चिपळूण ः शहराजवळील धामणवाणे येथील शेततळ्यामध्ये खवले मांजर पडल्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला मिळाली. वनविभागाचे वन्यप्राणी बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. खवले मांजराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. खवले मांजराची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यामध्ये रामपूर वनरक्षक शिंदे, राहुल गुंटे व नंदकुमार कदम यांनी मदत केली.