संपकरी गुंतले गौळण, भजन अन् लोककलेत

संपकरी गुंतले गौळण, भजन अन् लोककलेत

-ratchl१८१.jpg ः
89902
चिपळूण ः जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी घोषणा देताना तालुक्यातील ग्रामसेवक.
-ratchl१८२.jpg ः
८९८४८
प्रांत कार्यालयामोर मनोगत व्यक्त करताना विविध संघटनांचे पदाधिकारी.
--

संपकरी गुंतले गौळण, भजन अन् लोककलेत

सोमवारी करणार थाळीनाद ; राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने बळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाची धार दिवसेंदिवस वाढतच आहे. संपाच्या पाचव्या दिवशी प्रांत कार्यालयासमोर संपकऱ्यांनी संगीत भजन करतानाच गौळण व लोककला सादर करत शासनाचे या संपाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी या संपाला भेट देऊन पाठिंबा दिला.
एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी १४ मार्चपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपास सुरवात केली आहे. पाच दिवस झाले तरी या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, संपकऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवली आहे. शहरात शुक्रवारी मोर्चा काढल्यानंतर शनिवारी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने केली. संपात सहभागी झालेल्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी विविध गीतगायन केले तसेच गण गौळण सादर करत माहोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संगीत भजनाचीही त्यास साथ मिळाली तर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध कविता सादर केल्या. या सारा लोककलेचा जागर करत शासनावर उपरोधिक टीका केली.
गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या या संपामुळे शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. विशेषतः आरोग्य विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालय, नगर पालिका दवाखान्यातील कर्मचारी संपात असल्याने ठेकेदारी कर्मचाऱ्यांमार्फत कामकाज चालवले जात आहे. या पद्धतीने ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, शाळा, पशुसंवर्धनचे दवाखाने, कृषी कार्यालयीन कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने ग्रामस्थांना त्याचा मोठा फटका बसला आहे. तहसील कार्यालय अथवा पंचायत समितीत नेहमीची असणारी ग्रामस्थांची वर्दळ कामेच होत नसल्याने थंडावली आहे. दरम्यान, आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी चिपळुणात सोमवारी थाळीनाद करण्यात येणार आहे तर मंगळवारी जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत. त्यानंतर काळे कपडे परिधान करून शासनाचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे समन्वयक समितीकडून सांगण्यात आले.
-
वसुली रखडली, ठेकेदारही सलाईनवर

मार्चअखेरीस मोक्याच्या क्षणी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. पाच दिवसापासून संप सुरू राहिल्याने विविध घटकातील लोकांना त्याचा फटका बसला. अधिकारी, कर्मचारी संपात असल्याने शासकीय देयके तसेच वसुली रखडली आहे. संप वाढतच चालल्याने ठेकेदार मात्र सलाईनवर राहिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com