
कृषी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर कार्यशाळा
कृषी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर कार्यशाळा
सावर्डे, ता. १८ ः स्पर्धा परीक्षांमधील यशाचा उपयोग हा फक्त पद, पैसा, प्रतिष्ठा यांसाठी नसून आपले समाजाविषयी असणारे दायित्व पार पाडण्यासाठी आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी हा दृष्टिकोन ठेवून या क्षेत्राकडे वळू नये, असे प्रतिपादन प्रा. दिनेश ताठे यांनी केले.
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय व युनिक अॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व भारतीय लोकसेवा आयोगामधील विविध पदे, त्यासाठी असणाऱ्या परीक्षा व त्यांचे स्वरूपविषयी मार्गदर्शन केले. या वेळी शिक्षणसंस्थेचे सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, प्रवीण बुगे, प्रा. अश्विनी महाडीक, प्रा. तुषार बिजितकर आदी उपस्थित होते. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, कला व वाणिज्य, बीएमएस, एमबीए, बीएससी या व्यावसायिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता.