आमदार नीतेश राणेंकडून स्टॉलधारकांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नीतेश राणेंकडून 
स्टॉलधारकांची फसवणूक
आमदार नीतेश राणेंकडून स्टॉलधारकांची फसवणूक

आमदार नीतेश राणेंकडून स्टॉलधारकांची फसवणूक

sakal_logo
By

89893
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक कन्हैया पारकर. शेजारी नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक आदी.


आमदार नीतेश राणेंकडून
स्टॉलधारकांची फसवणूक

कन्हैया पारकर; नगरपंचायतीने पर्यायी व्यवस्था करून द्यावी

कणकवली, ता.१८ : शहरात चौपदरीकरणावेळी भाजी, फळ आणि इतर विक्रेते विस्थापित झाले. त्‍यावेळी त्‍यांचे पूनर्वसन करू, अशी ग्‍वाही आमदार नीतेश राणे यांनी दिली होती; मात्र मागील चार वर्षांत या विक्रेत्‍यांची कोणतीही व्यवस्था राणे यांनी केली नाही. त्‍यांनी या विक्रेत्‍यांना आश्वासन देऊन फसवणूक केली, असा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला. दरम्‍यान, शहरातील उड्डाणपुलाखाली भाजी, फळ व इतर प्रकारच्या विक्रेत्‍यांना बसण्याची व्यवस्था नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी केली होती. आता विस्थापित झालेल्‍या या विक्रेत्‍यांच्या पूनर्वसनाचीही व्यवस्था नगरपंचायतीने करावी, अशीही मागणी श्री.पारकर यांनी केली.
शिवसेना कार्यालयात पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेनेचे राजू राठोड उपस्थित होते. पारकर म्‍हणाले, ‘‘शहरात विक्रेत्‍यांचे पुनवर्सन करण्याबाबत आमदार नीतेश राणे कोणतीही कार्यवाही करू शकले नाहीत; मात्र नगरपंचायतीने या विक्रेत्‍यांना उड्डाणपुलाखाली जागा निश्‍चित करून दिली. नगरपंचायत निधीतून या विक्रेत्‍यासाठी उड्डाणपूलाखाली कापड लावण्यात आले. तसे नियमितपणे बाजार कराचीही वसूली या विक्रेत्‍यांकडून केली जात आहे.’’
---
यापुढे पुलाखाली व्यवसाय नको
दरम्‍यान, उड्डाणपुलाखालील सर्व दुकाने महामार्ग विभागाने हटवली आहेत. तसेच पुढील काळातही सातत्‍याने कारवाई होणार असल्‍याचा इशारा महामार्ग विभागाने दिला आहे. त्‍यामुळे या विक्रेत्‍यांच्या पूनर्वसनाची जबाबदारी नगरपंचायतीने घ्यावी. तसेच यापुढील काळात तरी विक्रेत्‍यांना शहरातील उड्डाणपुलाखाली व्यवसाय करण्यासाठी नगरपंचायतीने परवागनी देऊ नये, अशी मागणी श्री.पारकर यांनी केली आहे.