जैवविविधतेवर कार्यशाळा

जैवविविधतेवर कार्यशाळा

विखारेगोठणे महाविद्यालयात जैवविविधतेवर कार्यशाळा

राजापूर ः तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात माजी विद्यार्थी समिती, आयक्युएसी आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ’जैवविविधता संवर्धन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. घनश्याम हराळे, डॉ. अतुल भावे, माजी विद्यार्थी समितीप्रमुख प्रा. जी. आर. करडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेत प्रा. हबिबा सायेकर यांनी जैवविविधतता, तिचे महत्व आणि संवर्धन आदींविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. ए. के. शेवडे यांनी केले तर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
-
तळवडेत संवाद महिला भगिनींशी

राजापूर ः सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे तालुक्यातील तळवडे येथे ‘संवाद महिला भगिनींशी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी, अर्बन बँकेच्या संचालक प्रतिभा रेडीज, सफाई कामगार परिवर्तन संघाचे अध्यक्ष रमेश हरळकर, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, सामाजिक कार्यकर्त्या शशिताई देवरूखकर, ग्रामपंचायत सदस्य मनिषा मोरे, सानिका राणे, मंगेश रबसे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश गुडेकर, संपादिका स्वप्ना हरळकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
-
राजापुरातील चार कामांसाठी २ कोटी ६० लाख मंजूर

राजापूर ः आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जिल्हा वार्षिक वार्षिक योजनेंतर्गत तेरवण बाईंग वाडीपूल (दीड कोटी), भू भिंगे वाडीपूल ( ५० लाख), धोपेश्वरपूर्व खांबलवाडी रस्ता (३० लाख), पेंडखळे शंखेश्वर मंदिर ते निनावेवाडी मंदिर (३० लाख ) या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. या मंजूर कामांचे प्रशासकीय पत्र या भागातील ग्रामस्थ आणि सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी सुपूर्द केले. या वेळी माजी सभापती सुभाष गुरव, अभिजित तेली, सरपंच राजेश गुरव, उपसरपंच सुचिता सोगम, सरपंच खानविलकर आदी उपस्थित होते.
-

-rat१८p१२.jpg ः
८९८३७
राजापूर ः कृषी सन्मान पुरस्काराने अमर खामकर यांचा सत्कार करताना कमलजित सिंग.
-

प्रगतशील शेतकरी अमर खामकरांचा गौरव

राजापूर ः लांजा आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांना ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट या कंपनीतर्फे कृषी सन्मान पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. खामकर यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना कमीत कमी रासायनिक खतांचा वापर आणि जीवामृतासह सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करून शेती उत्पादने घेतली आहेत. शेतीक्षेत्रातील त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट कंपनीचे एमडी कमलजीत सिंग यांनी कृषी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सन्मानाबद्दल खामकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
-

कब्रस्तानच्या कंपाउंड वॉल उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

रत्नागिरी ः राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक, सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी जमातुल मुस्लिमिन बाजारपेठ रत्नागिरीच्या कॉन्व्हेंट हायस्कूल धनजीनाका शेजारी असलेल्या कब्रस्तानच्या कंपाउंड वॉलसाठी निधी मंजूर केला. या कामाचे भूमिपूजन उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी नगरसेवक निमेश नायर, विकास पाटील, सुहेल मुकादम आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com