Fri, March 24, 2023

रत्नागिरी- निधन
रत्नागिरी- निधन
Published on : 18 March 2023, 12:27 pm
-rat१८p१७.jpg-
८९८५४
इंदिरा परांजपे
-
इंदिरा परांजपे यांचे निधन
रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे, उंबरवाडी येथील इंदिरा विष्णू परांजपे (वय ८९) यांचे निधन झाले. १९७७ ला त्यांचे यजमान (कै.) हभप विष्णू परांजपे यांचे निधन झाल्यावर इंदिरा परांजपे यांनी न डगमगता दु:खावर मात करत संसार मोठ्या धैर्याने सांभाळला. पूर्वापार असलेल्या शेतीवाडी, गुरेढोरे यामध्ये लक्ष घालून अत्यंत गरिबीत त्यांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन संसाराचा गाडा योग्यप्रकारे हाकला. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक शांत, संयमी व कष्टाळू व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.