इंधन चोरी

इंधन चोरी

मंडणगडमध्ये बसमधील इंधन चोरी

मंडणगड ः मंडणगड तालुक्यातील वेळास येथील एसटी बसस्टँडवर मुक्कामी असलेल्या बसमधील डिझेल अज्ञाताने चोरून नेले. या प्रकरणी बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिझेल चोरीची ही घटना १५ मार्चला रात्री घडली. याबाबत एसटी बसचालक आत्माराम जानाजी गायकवाड (वय ३५, मूळ रा. कासरवाडी, पुणे) यांनी बाणकोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आत्माराम गायकवाड हे एसटी (एमएच-१४- बीटी-१०९७) घेऊन पिंपरी चिंचवड येथून वेळास येथे गेले होते. ही बस वेसाळ एसटी बसस्टँडवर मुक्कामी असताना अज्ञाताने एसटीच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरून नेले. या प्रकरणी अधिक तपास बाणकोट पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com