केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था
केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था

केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

८९९०४
चिपळूण ः केळणेफाटा ते काडवली रस्त्याची झालेली चाळण.
-
केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था

चिपळूण, ता. १८ ः खेड तालुक्यातील केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. येत्या काही दिवसांत डांबरीकरणास सुरवात न झाल्यास आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत येथील ग्रामस्थ आहेत.
केळणेफाटा ते काडवली रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. एखादे समोर वाहन जात असले तर मागून येणाऱ्या वाहनचालकांना धुळीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी येथील ग्रामस्थ लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, या रस्त्याच्या डांबरीकरणाला अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. पर्यायाने येथील ग्रामस्थ व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. येत्या काही दिवसांत या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरवात न झाल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
या रस्त्याच्या मंजुरीबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणार असून प्रस्ताव ठाणे येथील कार्यालयात तांत्रिक मंजुरीला आहे. ही मंजुरी मिळाल्यावर रस्ता डांबरीकरण कामाला सुरवात होईल, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.