सेवारस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवारस्त्याचे डांबरीकरण 
करा, अन्यथा आंदोलन
सेवारस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन

सेवारस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

89925
कणकवली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सेवारस्त्याची दुरवस्था झाली आहे.

सेवारस्त्याचे डांबरीकरण
करा, अन्यथा आंदोलन

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा इशारा

कणकवली, ता.१८ : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सेवारस्त्यावर खड्डे पडले आहेत. येथील खड्डे चार दिवसांत डांबरीकरणाने न बुजविल्‍यास आंदोलन करू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला शिवरायांचा पुतळा चौपदरीकरणामुळे बाधित होत होता. सहा महिन्यांपूर्वी तेथील पुतळा स्थलांतरीत करण्यात आला. त्‍यानंतर या पुतळा असलेल्‍या जागेचे डांबरीकरण होणे आवश्‍यक होते; मात्र सहा महिन्यांत महामार्ग विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. खड्डेयुक्त रस्त्यामुळे येथे वारंवार अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे चार दिवसांत येथील रस्त्यावर डांबरीकरण करावे. अन्यथा राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्या विरोधात आंदोलन छेडू, असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिला.