हिर्लोक-सावंतवाडी बसची काच अचानक फुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिर्लोक-सावंतवाडी बसची 
काच अचानक फुटली
हिर्लोक-सावंतवाडी बसची काच अचानक फुटली

हिर्लोक-सावंतवाडी बसची काच अचानक फुटली

sakal_logo
By

89927
हिर्लोक-सावंतवाडी बसची काच फुटली.

हिर्लोक-सावंतवाडी बसची
काच अचानक फुटली
सावंतवाडी ः हिर्लोक-सावंतवाडी एसटी बसची काच अचानक फुटली. हा प्रकार आज दुपारी अडीचच्या सुमारास कोलगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. नेमकी काच कशी फुटली, हे चालकाला कळले नाही. कोणी तरी दगड मारला असावा किंवा झाडाची फांदी लागली असावी, असा संशय चालकाने व्यक्त केला. हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले; परंतु किरकोळ नुकसानी असल्यामुळे काही नोंद करण्यात आली नाही. याबाबत पोलिस हवालदार मनोज राऊत यांना विचारले असता त्यांनीही दुजोरा दिला. नेमकी काच कशी फुटली, हे त्या चालकालाच माहिती नाही. त्यामुळे याबाबत त्यांनी तक्रार दिली नाही, असे त्यांनी म्हटले.
.............
सावंतवाडीत उद्यापासून कर्ज मेळावा
सावंतवाडी ः गुढीपाडवा सणानिमित्त कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., सावंतवाडी या संस्थेमार्फत दुचाकी कर्ज मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या पाहून निवड करता येणार आहे. हा मेळावा २० ते २२ मार्च दरम्यान येथील केसरकर कॉम्प्लेक्स, गांधीचौक येथे होणार आहे. कोटेशनच्या ९० टक्केपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. पगारदार व्यक्तीसाठी १०० टक्के कर्ज दिले जाणार आहे. कर्जासाठी इ.एम.आय. केवळ २७ रुपये (प्रति हजारी) असा आहे. सर्व सभासद, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्षांनी केले आहे.