पावस-बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू

पावस-बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू

rat१८p२५.jpg
८९९२२
प्रवेश पावसकर
------------
बोटीवरून पडून खलाशी बेपत्ता
पावस, ता. १८ ः पावस फिनोलेक्स जेटीसमोर अकरा वाव अंतरावर मच्छीमारी करणाऱ्या बोटीवरून पाय घसरल्याने पाण्यात पडला असून अद्याप त्याचा शोध लागला नसून पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार आर. डी. सावंत तपास करत आहेत.
शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी साडेचार वाजता काळबादेवी येथील सुजन सुभाष पाटील यांची मच्छीमार बोट मच्छीमारी करण्यासाठी अकरा वाव अंतरावर मच्छीमारी करण्यासाठी फिरत होती. पावस बाजारपेठेतील प्रवेश प्रभाकर पावसकर (वय ३२) हा पाटील यांच्या बोटीवर मच्छीमारी करण्यासाठी काम करत होता. काम करत असताना पाय घसरून बोटीतून तो पाण्यात पडला. त्याचा शोध घेण्यात आला; परंतु अद्याप सापडलेला नाही. पाय घसरून पडल्याने सापडला नसल्याने या मच्छीमार बोटीचा तांडेल विश्वास धोंडू डोर्लेकर (रा. पूर्णगड) याने पूर्णगड पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पावसकर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार आर. डी. सावंत, अवधूत सुर्वे हे तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com