Thur, June 1, 2023

पालिकेचे सुविधा केंद्र सुट्टीतही सुरू
पालिकेचे सुविधा केंद्र सुट्टीतही सुरू
Published on : 18 March 2023, 2:18 am
पालिकेचे सुविधा केंद्र सुट्टीतही सुरू
रत्नागिरी, ता. १८ : रत्नागिरी पालिकेपुढे घरपट्टी आणि पाणीपट्टीचे वसूलीचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी दोन्ही विभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पालिकेची पथके वसुलीसाठी फिरत आहेत. नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करीत आहेत. नागरिकाची गैरसोय होऊ नये, यासाठी १९, २५, २६ आणि ३० मार्चला या सुट्टीच्या दिवशीही पालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी पालिकेचे नागरी सुविधा कार्यालय उघडे राहणार आहे. तसेच ऑनलाईन करण भरण्यासाठी https://rmcratnagiri.in या वेबसाईटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.