मोटार-दुचाकी अपघातात सावंतवाडीत एक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटार-दुचाकी अपघातात
सावंतवाडीत एक जखमी
मोटार-दुचाकी अपघातात सावंतवाडीत एक जखमी

मोटार-दुचाकी अपघातात सावंतवाडीत एक जखमी

sakal_logo
By

89941
सावंतवाडी ः अपघातग्रस्त मोटार.

मोटार-दुचाकी अपघातात
सावंतवाडीत एक जखमी
सावंतवाडी, ता. १८ ः येथे मोटारीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात वेंगुर्ले येथील परराज्यातील कामगार जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात आज दुपारी एकच्या सुमारास सबनीसवाडा येथील शाळा नंबर ४ च्या समोर असलेल्या उतारानजीक घडला.
चौकुळ येथील शिक्षक गावडे हे आपल्या मोटारीतून जात असताना सबनीसवाडा येथे त्यांच्या मोटारीला दुचाकीची धडक बसली. गावडे हे बाजाराच्या दिशेने येत होते, तर दुचाकीस्वार सबनीसवाडा येथे जात असताना हा अपघात झाला. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी जखमीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर मोटार रस्त्यात पलटी झाली; मात्र गावडे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची येथील पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.