आशा कर्मचाऱ्यांचा मुख्यालयात मोर्चा

आशा कर्मचाऱ्यांचा मुख्यालयात मोर्चा

89943
सिंधुदुर्गनगरी : आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेवर काढलेला मोर्चा.

आशा कर्मचाऱ्यांचा मुख्यालयात मोर्चा

विविध मागण्या; गटप्रवर्तकही आंदोलनात सहभागी

ओरोस, ता. १८ ः आशा कर्मचारी आणि गट प्रवर्तकांना आरोग्य सेवक म्हणून सेवेत कायम करावे, त्यांना २६ ते २८ हजार रुपये मानधन द्यावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनतर्फे जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देण्यासाठीचे निवेदन जिल्हा परिषद सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले.
आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करा, आशांना दरमहा किमान २६ हजार रुपये व गटप्रवर्तक यांना दरमहा किमान २८ हजार रुपये मानधन मिळावे, आशा व गटप्रवर्तकांना नियमित रजा, ग्रॅच्युईटी व अनुषंगिक लाभ मिळावेत, ४५ व्या व ४६ व्या भारतीय श्रम संमेलनाच्या शिफारशी लागू कराव्यात तसेच राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांशी तातडीने चर्चा करून त्यांना न्याय द्यावा, या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी ते जिल्हा परिषद भवन असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आशा युनियच्या जिल्हाध्यक्षा कॉ. प्रियांका तावडे, सचिव कॉ. विजयाराणी पाटील, नम्रता वळंजू, अर्चना धुरी, वर्षा परब आदी ५०० आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या. आशा वर्कर्स युनियनने जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढल्यानंतर या संघटनेने सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा दिला. या संपाबाबत लवकरच शासनाने तोडगा न काढल्यास आपली संघटनाही संपात सहभागी होणार असल्याचे सिटू संघटनेचे सचिव प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी यावेळी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com