देवगड किनाऱ्यावर मृत कासव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड किनाऱ्यावर मृत कासव
देवगड किनाऱ्यावर मृत कासव

देवगड किनाऱ्यावर मृत कासव

sakal_logo
By

देवगड किनाऱ्यावर मृत कासव
देवगड ः येथील समुद्रकिनारी एक मृत कासव आढळले. ते ऑलिव्ह रिडले जातीचे कासव होते. त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
याबाबतची माहिती अशी, येथील समुद्रकिनारी मृत कासव असल्याची माहिती तारामुंबरी येथील कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण तारी यांना मिळाली. घटनास्थळी पोचल्यावर तारी यांनी वन विभागाचे वनरक्षक नीलेश साठे यांना कळवले. मृत कासव ऑलिव्ह रिडले जातीचे होते. त्याची लांबी व रुंदी २४ बाय २४ इंच कवचाची असल्याचे दिसून आले. कासव अर्धवट कुजलेल्या अवस्थेत होते. मृत कासवाची नंतर विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी लक्ष्मण तारी, किरण पांचाळ, कल्याणी पांचाळ, ओमकार तारी आदी उपस्थित होते.