रत्नागिरी- फोटोफीचर

रत्नागिरी- फोटोफीचर

शिरगाव, साखरतर रस्ता खड्डेमय....

रत्नागिरी ः प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळेला रत्नागिरी शहरातून शिरगाव, आरे-वारेमार्गे जाणे पर्यटक पसंत करतात. येथून जाताना समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेत जाता येते. मात्र शहरातून बाहेर पडल्यावर लागणारा शिरगाव, साखरतर पुलापर्यंतच्या टप्प्यातील रस्त्याची दूरवस्था झाल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करतात. साखरतरच्या पुढील रस्ता चांगला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. हा खड्डेमय रस्ता कधी होणार, असा प्रश्न प्रवाशासह पर्यटक उपस्थित करत आहेत. एप्रिलपासून पर्यटन हंगाम सुरू होत असल्यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी सुरू होईल. तत्पूर्वी तरी हे खड्डे बुजवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- rat19p1.jpg-
90027
रत्नागिरी ः साखरतर पुलानजीक रस्त्यावरील डांबर वाहून जाऊन खड्डे पडले आहेत.
- rat19p2.jpg ः
90038
मुख्य मार्गावर आडी फाट्यानजीक पडलेला भलामोठा खड्डा.
- rat19p3.jpg ः
90046
शिरगाव येथील पेट्रोलपंपाजवळ पडलेले खड्डे.
- rat19p4.jpg ः
90047
शिरगाव मयेकरवाडीनजीक वळणावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com