दाभोळ-कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 5 लाखाची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 5 लाखाची तरतूद
दाभोळ-कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 5 लाखाची तरतूद

दाभोळ-कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 5 लाखाची तरतूद

sakal_logo
By

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी
दोपालीत ५ लाखाची तरतूद
नगरपंचायतीचा निर्णय ; १८० कुत्र्यांचे निर्बिजीकरण अंतिम टप्प्यात
दाभोळ, ता. १९ : दापोली शहरातील १८० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे दापोली शहरातील वाढणारी कुत्र्याची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. दापोली नगरपंचायातीने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात प्रथमच कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायतीने निर्बिजीकरण करण्याची निविदा काढली होती. त्याला नागपूर येथील निर्मिती पिपल्स अँनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेने दापोलीतील १८० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची जबाबदारी घेतली होती. यामध्ये प्रत्येक कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्यासाठी १ हजार ९५० रुपये याप्रमाणे साडेतीन लाख रुपये खर्च होणार आहे.
या कामासाठी असलेल्या पथकात ३ पशुवैद्यकीय अधिकारी, १ व्यवस्थापक व ८ सहाय्यकांचा समावेश आहे. पकडलेल्या कुत्र्यांना शहरातील काळकाई कोंड येथील नगरपंचायतीच्या व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृहाच्या इमारतीत नेवून त्यांच्यावर शास्त्रक्रिया केल्या जात आहेत. या कुत्र्यांना ३ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येते व जेथून त्यांना पकडण्यात आले त्याच ठिकाणी त्यांना सोडण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये सातत्य राहिले व चार ते पाच वर्षे ही मोहिम राबवली तरच अपेक्षित निकाल मिळेल व शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आला घालणे शक्य होणार आहे.