तिलकांचन गवस उपतालुकाप्रमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिलकांचन गवस
उपतालुकाप्रमुख
तिलकांचन गवस उपतालुकाप्रमुख

तिलकांचन गवस उपतालुकाप्रमुख

sakal_logo
By

तिलकांचन गवस
उपतालुकाप्रमुख
दोडामार्ग ः शिवसेनेच्या दोडामार्ग उपतालुकाप्रमुखपदी पिकुळे येथील तिलकांचन शंकर गवस यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सुचनेनुसार गवस यांची ही निवड करण्यात आली. शिवसेनेचा सावंतवाडीत नुकताच कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी गवस यांना आमदार फाटक व केसरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
---------------
रामदास मेस्त्री विभागप्रमुखपदी
दोडामार्ग ः शिवसेनेच्या दोडामार्ग तालुक्यातील मणेरी विभागप्रमुखपदी कुडासे येथील रामदास मेस्त्री यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सुचनेनुसार मेस्त्री यांची निवड करण्यात आली. यावेळी अशोक दळवी व गणेशप्रसाद गवस उपस्थित होते.
--------------
वेंगुर्लेत १०६ जणांची
मोफत नेत्रचिकित्सा
वेंगुर्ले ः श्री देवी सातेरी देवस्थान वेंगुर्ले व लॉरेन्स अॅण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराचा १०६ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी लॉरेन्स अ‍ॅण्ड मेयोच्या नेहा राणे, मयूर घोगळे, अक्षय शिंदे, मयूर पारधी, अभिजीत सावंत, ओमकार ढवळे, अवधूत राणे, देवी सातेरी देवस्थानचे दाजी परब, सुनील परब, रवींद्र परब, दत्तप्रसाद परब, सहदेव परब, जयवंत उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, विनायक परब, महेश परब, संदीप परब, मंगेश परब, वासुदेव परब परब आदी उपस्थित होते.
-----------------
पालव, मेस्त्रींचा केरमध्ये सत्कार
दोडामार्ग ः शिमगोत्सवानिमित्त श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ, इन्सुलीचे संचालक सचिन पालव, संतोष मेस्त्री यांचा कोकणच्या कला संवर्धनासाठी घेत असलेल्या कार्याबद्दल आदर्श गाव केरच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पालव, मेस्त्री यांनी कोकणची कला टिकवत असताना कलाकारांचा होत असलेला सन्मान ऊर्जा देत असतो. केर गावाने कलाकारांचा केलेला सन्मान हा कोकणच्या कला संवर्धनासाठी चाललेली प्रामाणिक तळमळ असल्याचे सांगितले.