
प्रतीक्षा तावडे यांना जीवनगौरव पुरस्कार
90064
कुडाळ ः प्रतीक्षा तावडे यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.
प्रतीक्षा तावडे यांना
जीवनगौरव पुरस्कार
सावंतवाडी ः एस. आर. दळवी फाउंडेशन शाखा सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवारी (ता. १७) मराठा समाज हॉल कुडाळ येथे ‘उत्कर्ष शिक्षक अॅवॉर्ड-२०२३’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. एस. आर. दळवी फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर १ च्या उपक्रमशील पदवीधर शिक्षिका प्रतीक्षा तावडे यांना फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र दळवी, संचालिका सीता दळवी यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, डॉ. नयन भेडा, अल्पा शाह, महेश सावंत, प्रा. रुपेश पाटील, ज्योती बुवा, चेतन बोडेकर, सचिन मदने आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल तावडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
...............
‘साप्ताहिक एक्स्प्रेस’च्या वेळेत बदल
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या व सिंधुदुर्गातील कुडाळ स्थानकावर थांबा असणाऱ्या श्रीगंगानगर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेसच्या काही स्थानकांवरील वेळांमध्ये बदल केला आहे. हा बदल २१ मार्चपासून लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार ही गाडी एर्नाकुलम येथे दुपारी दोनला पोहाचून २.०५ ला सुटेल. कोट्टयम स्थानकावर दुपारी ३.३७ ला पोहोचून साडेतीनला सुटेल. तिरुवल्ला स्थानकावर सायंकाळी ४.०९ ला पोहोचून ४.१० ला सुटेल. चेंगन्नूर स्थानकावर सायंकाळी ४.२० ला पोहोचून ४.२२ ला कायमकुलम जंक्शन येथे ४.४२ ला सुटेल.