कडावलमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

कडावलमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

90067
कडावल ः पंचक्रोशी वाचनालयात मार्गदर्शन करताना स्नेहा पाटील.

कडावलमध्ये विविध स्पर्धांना प्रतिसाद

८० मुलांचा सहभाग; पंचक्रोशी वाचनालयाचा उपक्रम


कुडाळ, ता. १९ ः कडावल पंचक्रोशी वाचनालय व ग्रंथसंग्रहालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित केलेल्या अनुलेखन, वाचन व पुस्तक परीक्षण आदी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात पंचक्रोशीतील चार शाळांनी सहभाग घेतला. एकूण ८९ मुले सहभागी झाली.
व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष सदानंद तावडे, कार्यवाह संभाजी वळंजू, राजेंद्र सावंत, मधुकर पवार, भडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन धुरी, केंद्रशाळा कडावल नंबर १ चे मुख्याध्यापक गजेंद्र राणे, ग्रंथपाल दिक्षा परब आदी उपस्थित होते.
स्पर्धांचा निकाल अनुक्रमे असा ः अनुलेखन स्पर्धा पहिली व दुसरी गट-सीया सावंत (शाळा वर्दे नं. १), दीपेश मोरजकर (वर्दे नं. १), सान्वी सरंगले (कडावल नं. १). तिसरी व चौथी-पूजा घाडी, रुद्र पिकुळकर, स्वरा दुखंडे (तिन्ही शाळा कडावल नं. १). पाचवी ते सातवी-किमया पाताडे (शाळा वर्दे नं. १), श्रेया साळुंखे (कडावल नं. १), रक्षित सावंत (भडगाव हायस्कूल), आठवी व नववी-वंदना पवार (भडगाव हायस्कूल), नेहा लोट (भडगाव हायस्कूल), तेजश्री घोगळे (पांग्रड हायस्कूल), साहिल राणे (भडगाव हायस्कूल). वाचन स्पर्धा पहिली व दुसरी गट-ओवी मुंज (कडावल नं. १), दीपेश मोरजकर (वर्दे शाळा नं. १), व्हेरोना डिसोझा (कडावल नं. १). पाचवी ते सातवी गट-सीमा ठाकूर (कडावल नं. १), प्रज्ञेश पालव (शाळा कडावल नं. १), निधी पवार (वर्दे नंबर १), तन्वी सुतार (भडगाव हायस्कूल). आठवी व नववी गट-वंदना पवार (भडगाव हायस्कूल), समीक्षा मर्गज (पांग्रड हायस्कूल), मैथिली लोट (भडगाव हायस्कूल), वेदांत वळंजू (भडगाव हायस्कूल). मोठा गट पुस्तक परीक्षण-तेजस्वी चव्हाण (जिल्हा परिषद शाळा वर्दे नंबर १), गजेंद्र राणे (केंद्रशाळा कडावल नंबर १), भालचंद्र जाधव (जिल्हा परिषद शाळा वर्दे नंबर १). विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संभाजी वळंजू यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथपाल परब यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com