रत्नागिरी- तीन लाखांची देणगी

रत्नागिरी- तीन लाखांची देणगी

फोटो ओळी
-rat१९p२६.jpg- रत्नागिरी : भिडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ. मिलिंद पटवर्धन यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाकरिता देणगी अॅड. दीपक पटवर्धन यांच्याकडे दिली. सोबत चंद्रशेखर पटवर्धन, आनंद पाटणकर, मालती खवळे.
----------
भिडे ट्रस्टची तीन लाखांची
जिल्हा वाचनालयाला देणगी
रत्नागिरी, ता. १९ : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या ग्रंथालय सेवा कार्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त भिडे चॅरिटेबल ट्रस्टने वाचनालयास तीन लाख रुपयांची देणगी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. मिलिंद पटवर्धन आणि कार्यवाह चंद्रशेखर पटवर्धन यांनी तीन लाख रुपयांची देणगी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द केली.
डॉ. मिलिंद पटवर्धन हे (जिल्हा) नगर वाचनालयाचे जुने वाचक आहेत. त्या प्रसंगी डॉ. पटवर्धन यांनी दुर्मिळ पुस्तके सहजपण मिळण्याचे हक्काचं ठिकाण असलेलं जिल्हा नगर वाचनालय हे अत्यंत नेटकेपणाने विकसित केलेले वाचनालय आहे. १९५ वर्षाची परंपरा १ लाख ११ हजारांची ग्रंथ संपदा हे वैभव आहे. या वाचनालयाला देणगी देताना खूप समाधान होते. उचित कामासाठी दिलेला हा निधी औचित्यपूर्ण दिवशी देता आला याचा आनंद होत असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले. वाचनालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात देणगीचा धनादेश देण्यात आला. या वेळी चंद्रशेखर पटवर्धन, आनंद पाटणकर, सौ. मालती खवळे आणि वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. ॲड. पटवर्धन यांनी देणगीदार संस्था आणि डॉ. पटवर्धन, चंद्रशेखर पटवर्धन यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com