रत्नागिरी- बिग स्टोरी

रत्नागिरी- बिग स्टोरी

---
बिगस्टोरी ः नरेश पांचाळ
फोटो ओळी
- rat19p6.jpg-KOP23L90049 राजापूर ः रायपाटण येथे शिमगोत्सवात खुणा शोधताना पालखी
- rat19p7.jpg- KOP23L90050 पाली ः श्री लक्ष्मीपल्लिनाथाच्या शिमगोत्सवात पालखी नाचविताना ग्रामस्थ.
- rat19p21.jpg-KOP23L90040 राजापूर ः रायपाटण ग्रामदेवता श्री वडचीआई पालखी.
- rat19p23.jpg-KOP23L90042 गुहागर ः असगोलीतील प्रसिद्ध संकासूर
- rat19p24.jpg ः 23L90043 रत्नागिरी ः श्री भैरी देवाची होळी आणताना रत्नागिरीतील बारा वाड्यातील ग्रामस्थ.
- rat19p25.jpg ःKOP23L90044 रत्नागिरी ः झाडगाव येथील सहाणजवळ होळी उभा करताना अशी एकी दिसून येते.
----------

होssssळी रे
जल्लोष, विलक्षण उर्जोचा सण

कोकणचा लाडका ; ...आमचे दाराशी हाय शिमगा, नमन, खेळे, गोमूचा नाच लक्षवेधी

ग णपती आणि शिमगोत्सव हे दोन सण कोकणी माणसासाठी महत्त्वाचे आहेत. हे सण साजरे करण्यासाठी नोकरी-व्यावसायानिमित्त परजिल्ह्यात असलेले चाकरमानीही आवर्जून गावाकडे येतात. त्यात शिमगा म्हटलं की, कोकणातील वातावरण उत्सवाने भारवलेले असते. आमचे दाराशी हाय शिमगा, असे म्हणत शिवरीच्या होळ्या पेटवून त्याभोवती फेर धरत नाचण्याचा आणि पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आनंद वेगळाच असतो. हाय रे हाय आणि ..... च्या जीवात नाय काय रे....होलियो अशा फागांचे शब्द कानावर पडले की, कोकणी माणसाच्या अंगात काही वेगळेच बळ संचारतं. गुलालाच्या गुलाबी रंगात न्हावून गेलेले आसमंत डोळ्यासमोर दिसू लागते. कोकणातील देव साक्षात आपल्या दारी येतायत, ही भावना मनात एका विलक्षण ऊर्जेची निर्मिती करते. देवाला घातलेल्या गाऱ्हाण्याचे स्वर, होळी, संकासूर, खेळे, गोमू, दशावतार, नमन व मृदुंग, ढोल-ताश्यांची लयकारीत कोकणवासिय रमलेले पहायला मिळतात. जिल्ह्यात काही ठिकाणी शिमगोत्सवाची धूम सुरू असून त्याची सांगता पाडव्याला होणार आहे. प्रथा आणि पंरपरांनी सजलेल्या या शिमगोत्सवावर टाकलेला प्रकाश....
-----

अशी होते होळीची सुरवात
कोकणात फाग पंचमीपासून होळी उत्सवाला सुरवात होते. गावाजवळच्या जंगलातून शेवरी, आंबा, सुरमाड आदी झाडांची होळी गावकरी आणतात. ही होळी आणण्यासाठी बालगोपाळ आणि वाडीतील मंडळी ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत होळी आणतात. होळी तोडण्याची प्रथा, होळी तोडताना नारळ आणि पानाचा मानाचा विडा होळीच्या झाडाच्या बाजूला ठेवला जातो. हा मान मानकऱ्याचा असतो. होळी तोडण्यापूर्वी गाऱ्हाण घातलं जात. होळी तोडण्यासाठी गावातील प्रत्येक जातीला मान असतो.
-----
पालखीतून देव येतो घरोघरी
जिल्ह्यात काही ठिकाणी शिमगोत्सवाची सांगता रंगपंचमीला होते. काही गावात वाडीवस्तीत घरोघरी पालखी नेण्याची परंपरा आहे. तेथे शिमगोत्सव पाडव्यापर्यंत सुरू असतो. या उत्सवातील जल्लोषाची पाने प्रत्येक कोकणी माणसाच्या आठवणीत रूजलेली आहेत. अनेक अविस्मरणीय क्षण तरुणांपासून ते आबालवृद्धापर्यंत प्रत्येकजण साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हा सण देशाच्या विविध भागात होळी म्हणून साजरा होतो. परंतु कोकणात या सणाचा थाट वेगळाच आहे. हा ग्रामदेवतांचा उत्सव म्हणूनच गणला जातो. या सणाची सुरवात होळीच्या मुख्य सणाच्या काही दिवस अगोदर होते. सुरवातीला देवीची रूपे लावली जातात. रूपे लागल्यानंतर पालख्या गावोगावी नेण्यास परवानगी असते. काही गावांमध्ये वेगवेगळ्या गावांच्या पालख्या एकमेकांना भेटण्यासाठी एकत्र येतात. ग्रामदेवतांच्या भेटीचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भाविक हजारोंच्या संख्येने गर्दी करतात.
----

ही आहेत वैशिष्ट्ये
* आजुबाजूच्या ग्रामदेवतांच्या पालख्या रत्नागिरीतील श्री देव भैरी बुवाच्या भेटीला येतात
* यंदा जिल्ह्यात 1 हजार 254 सार्वजनिक तर 2 हजार 694 खासगी होळ्या उभ्या राहिल्या
* 1 हजार 407 पालख्या सजल्या
* भद्रे आणि तेरसे असे दोन प्रकारचे शिमगे साजरे
* नमन किंवा दशावतार (सिंधुदुर्ग) शिमग्याचे प्रमुख आकर्षण
* नारदमुनी, इंद्र देव, शंकर, श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी यासह देवी, देवता अवतरले
----------

खुणा काढण्याची अशी परंपरा
शिमगोत्सवाचा शुभारंभ वा त्यानंतर खुणा काढण्याची प्रथा आहे. नवीन पिढीला आपली परंपरा, संस्कृती आणि देवाच्या दिव्यत्वाची प्रचिती यावी. या पिढीनेदेखील भविष्यात या परंपरा जोपासाव्यात आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे हा उद्देश असतो. खुणेच्या आदल्या रात्री ग्रामदेवतेचे मानकरी मंडळी गावातील एखादी सपाट जागा हेरून तेथे खड्डा खोदून नारळ आणि फुले लपवतात. दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी तेथे आणून ढोलताशाच्या गजरात नाचवली जाते. पालखी त्या ठिकाणाच्या रोखाने खुणेचा शोध घेते आणि ती खूण बिनचूक शोधून काढते.

रायपाटणचा अनोखा ‘रोमट’

राटपाटण (ता. राजापूर) येथील ग्रामदेवता श्री वडची आई देवीचा होलिकोत्सव आणि ‘रोमट’ अनोख्या पद्धतीने साजरे केले जाते. शिमगोत्सवाच्या फाका देत पौर्णिमेदिवशी होळी नाचवत मांडावर आणली जाते. त्यानंतर धुलिवंदन दिवशी होळीला सजवून ती उभी केली जाते. ती उभी करताना होळीच्या उंच टोकावर नारळ बांधला जातो. हा बांधलेला नारळ काढण्याचा खेळ रंगतो. त्यामध्ये लहान-थोर मंडळींसह सारेजण होळ्याच्या उंच टोकाला बांधलेला नारळ काढण्यासाठी होळीवर चढण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी झुंबड लागते. होळीवर चढणार्‍याला खाली खेचणारेही असतात. जेणेकरून आपल्याला नारळ काढण्याची संधी मिळावी. या चढाओढीत एकजण यशस्वी होतो. त्यानंतर रोमटाचा हा खेळ संपतो. ही परंपरा गेल्या कित्येक वर्षांची आहे. या व्यतिरिक्त अनेक गावांमध्ये कापडखेळे असतात. रंगसंगती असलेली अनोखी वेषभूषा केलेले खेळे डफ आणि टिपऱ्यावर ठेका धरत होत असलेले नृत्य खर्‍या अर्थाने कोकणच्या धार्मिक आणि लोककलेचा वारसा अधोरेखित करणारे असतात.


शिमगोत्सवाचे आकर्षण संकासूर
गुहागर तालुक्यातील शिमगोत्सवातील सर्वात प्रमुख आकर्षण असते ते संकासुराचे. दिसायला भयावह रौद्र रुप असलेतरी लहान मुलांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वांना आवडणारे हे पात्र. झटका देऊन मान हलविताना भेदक नजरेने पहाणारा, चिडवणाऱ्यांना पाठलाग धरुन पकडणारा, गोमुसोबत नाचणारा हा संकासुर पहाण्यासाठी सर्वांचीच गर्दी होते. या पात्राबद्दल अनेक दंतकथा आहेत. दशावतारात हयग्रीव नावाच्या दैत्य राजाची कथा आहे. हा राजा पराक्रमी, जनतेत प्रिय, ज्ञानी होता. ज्ञानप्राप्तीसाठी त्याने वेदांना पळविले. त्याच्याकडून ज्ञान मिळविले. मात्र त्यांना सोडून न देता बंदी बनवले. या वेदांना सोडविण्यासाठी देव आले म्हणून तो समुद्रात शंखात लपून बसला. मत्स्यावतारातील विष्णूने शंखात बसलेल्या हयग्रीवाचा वध करुन वेदांची सुटका केली. त्यावेळी त्याचा पराक्रम, ज्ञान, जनतेसाठी केलेले कार्य पाहून विष्णूने तु शंखासुर म्हणून प्रसिध्द होशील, फाल्गुन महिन्यात तुला पुजतील. असा वर दिला. काहीजण संकासुराला कृष्णाचा अवतार मानतात. तर काहींच्या मते ग्रामदेवताच्या अत्यंत जवळचा सेवक आहे. त्यामुळे खेळ्यातील संकासुराला नवस बोलण्याची आणि फेडण्याचीही प्रथा आहे. मात्र हे पात्र खेळ्यात कसे आले याचा संदर्भ कोणत्याही ग्रंथात मिळत नाही.

भैरीचा शिमगोत्सव

रत्नागिरीच्या बारा वाड्यांचा रखवालदार श्री देव भैरीचा शिमगोत्सव अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आवारातील पालख्यांची भेट असो वा होळी उभी करण्याचा कार्यक्रम. जागृत देवस्थान असलेल्या भैरीबुवाला रंगपंचमीच्या दिवशी सशस्त्र पोलिसांची सलामी दिली जाते, यातच सर्व काही आहे. भैरीबुवाची पालखी घरोघरी जात नसली तर ज्या मार्गावरून जाणार असते तिथे जल्लोष, फक्त भैरीचा जयघोष सुरू असतो. होळी ते रंगपंचमीपर्यंत भैरीचा शिमगा आनंदाने, उत्साहाने साजरा होतो. या उत्सवात रत्नागिरीकरांची एकी पाहायला मिळते.


नजर जिल्ह्यातील शिमगोत्सवावर
* मंडणगडातील शेवरेची ग्रामदेवता वर्धानमातेची ढालकाठी तालुक्यातील शिमगोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या, चांदीचा कळस व गावदेवीचा ध्वज असलेल्या पन्नास फूट उंचीच्या ढालकाठीवर आरूढ झालेली देवी 84 गावांतून प्रवास करते. ही शेकडों वर्षांची परंपरा आहे.
* दापोली तालुक्यात फाग पंचमीपासूनच पालख्या गावभोवनीला बाहेर पडतात. काट खेळे पालखीसोबत गावात फिरतात. फाल्गुन पौर्णिमेला मोठा होम लागला की शिमगोत्सवाचा समारोप होतो.
* चिपळुणच्या शिमगोत्सवातील सर्वांत मोठे आकर्षण असते ते करंजेश्वरीच्या शेरण्याचे. यावेळी शेरणं पहाण्यासाठी उसळतो जनसागर. चिपळूण शहरातील जुना भैरी व नवा भैरी यांची पालखी कमी कालावधीत संपूर्ण शहरात फिरते.
*संगमेश्वर तालुक्यातील गावागावात नवविवाहित दांम्पत्याने होमात नारळ टाकून पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या होमाला वर्षभरात लग्न झालेली दांम्पत्य गावात येतात.
* कसब्यातील रंगपंचमी (शिंपणे) जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अनेकजण ही रंगपंचमी अनुभवण्यासाठी येतात.
---------

- rat19p20.jpg ः संतोष सावंतदेसाई
कोट
पालीच्या श्री लक्ष्मीपल्लिनाथ देवस्थानचा शिमगोत्सव नियोजन फाग पंचमीला होते. 13 व्या शतकात श्रीदेव लक्ष्मीपल्लिनाथाच्या नावावरून पाली हे नाव झाले. पाली-पाथरट, कापडगाव, चरवेली अशा तीन गावांचा हा अधिपती म्हणून मुळ देवस्थान श्रीदेव करंबेळ, करंबेळ देवाने लक्ष्मीपल्लिनाथाला सर्व अधिकार बहाल केले. येथील कोकड होळी हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ढोलताश्यांच्या गजरात 50 ते 60 फूट आंब्याची होळी आणली जाते. ती नाचवून तिचा शेंडा तोडला जातो. 23 मार्चला श्रीदेव लक्ष्मीपल्लिनाथाची पालखी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करेल आणि गावाचे गाऱ्हाणं होऊन ढोलताशांच्या गजरात श्री लक्ष्मीपल्लिनाथ व पालखीत स्थानापन्न सर्व देवता यांची घाट धुपारतीने पूजा केल्यानंतर देव मंदिरात स्थानापन्न होईल. येथे शिमगोत्सवाची सांगता होते.
- संतोष सावंतदेसाई (खोत), मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष
--------

- rat19p18.jpg ःKOP23L90036 राकेश सावंत नाणीज
कोट

नाणीज येथील श्री धावजेश्वर मंदिरात शिमगोत्सवात होळी आणि पालखी नाचवली जाते. पालखी मानकरीसह प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आल्यानंतर पालखीच्या भोयांकडून (पालखी नाचवणारे) मानकरी आणि गुरव यांनी पटांगणात लपवून ठेवलेला नारळाचा शोध घेते आणि गावातील शिमगोत्सवाचा उत्साह द्विगुणित होतो.
- राकेश सावंत, मानकरी, श्री धावजेश्वर मंदिर, नाणीज


- rat19p19. jpg ः KOP23L90037 शरद देसाई रायपाटण
कोट
रायपाटण येथील ग्रामदेवता श्री वडची आई देवीचा होलिकोत्सव आणि ‘रोमट’ ही पारंपरिक पद्धत असल्याने ते पाहण्यासाठी गर्दी होते. होळीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी शिंपण्यावेळी रोमट हा प्रकार साजरा केला जातो. पालखी भंडारण्यावेळी समाज प्रबोधन म्हणून तमाशा, घुमट वाजवणे आणि पालखी नृत्य असे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. धुलिवंदन दिवशी होळीला सजवून उभी करतात आणि रोमट खेळ रंगतो.
- शरद देसाई, मानकरी, श्रीवडची आई देवस्थान, रायपाटण
-----------
- rat19p22.jpg ः संतोष घुमेKOP23L90041
कोट
नमन मंडळी गावोगाव अनवाणी पायाने फिरतात. संकासुर स्वत:च्या वजनाबरोबर घुंगुर पट्टा, हार, टोपरे यांच्या वजनासह धावतो. या मागे देवतांची शक्ती उभी असते, अशी श्रध्दा आहे. म्हणूनच गावोगावी संकासुरचे पूजन होते. संकासूर, खेळे यांच्याबद्दल अपमानजनक बोलला तर त्याला त्रास होतो.
- संतोष घुमे, असगोली नमन मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com